Ad will apear here
Next
दृष्टिहीनांना मिळाला राजेशाही लग्नाचा अनुभव

पुणे : सनई-चौघड्याचा निनाद... पारंपरिक वेशभूषा... सजलेली नवरा-नवरी... रुखवत अन कलवऱ्यांची धावपळ... मंगलाष्टकांचा मंजुळ स्वर... एकमेकांच्या डोळ्यात नव्या आयुष्याच्या सुरुवातीची उमेद...  आयुष्यातल्या परमोच्य आनंदाच्या क्षणाची चमक... चेहऱ्यावर खुललेले हास्य अन जोडीदाराच्या स्वप्नाची मैफल रंगवत देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने 'ते' अडकले पवित्र अशा विवाहबंधनात! आगळ्यावेगळ्या अशा या विवाहसोहळ्याने या दृष्टीहिनांना राजेशाही लग्नाचा अनुभव मिळाला.

निमित्त होते, क्रिप्स फाउंडेशनच्या वतीने आयोजिलेल्या २५ दृष्टिहीन जोडप्यांचा (दोघांनाही दृष्टी नसलेले) सामूहिक विवाह सोहळ्याचे. पुण्यात पहिल्यांदाच झालेला हा नयनरम्य आणि हृद्य सोहळा रविवारी गंगाधाम चौकातील जिनेंद्र प्रतिष्ठानच्या नाजूश्री सभागृहात पार पडला. यावेळी ३०० हुन अधिक लोकांना अन्नदान करण्यात आले. यावेळी  उद्योजक कृष्णकुमार गोयल, भावेश भाटिया, संस्थेचे अध्यक्ष मनोहर फेरवानी, सचिव ईश्वर कृपलानी, विश्वस्त भारत नागोरी, महेंद्र जैन, केवल सेठिया, सुरेश जेठवानी, सिमरन जेठवानी, विनोद रोहानी, गोपाल डावरा, रमेश पलंगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

त्याचबरोबर हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आणि पारशी धर्माचे धर्मगुरू नवविवाहित जोडप्यांना शुभाशिर्वाद देण्यास उपस्थित होते. काशीविश्वेश्वर येथील गुरुजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जोडप्याचे लग्न लावण्यासाठी २५ ब्राम्हण होते. विवाह सोहळ्यासाठी आवश्यक असणारा सर्व खर्च क्रिप्स संस्थेने उचलला असून रुखवत, झाल, मंगळसूत्र, जोडवी यांपासून घरात आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचा यात समावेश आहे. नववधूच्या मेकअपसाठी पुण्यातील नामवंत पार्लरने, जेवण व्यवस्थेसाठी प्रसिद्ध शहाजी केटरर्सने तर, वरातीसाठी दरबार बँड यांनी नि:शुल्क सुविधा पुरवली. वधूसाठी शालू, नवरदेवासाठी सलवार-कुर्ता आणि घरसंसारासाठी प्रत्येकी ५१ हजाराचा रुखवत देण्यात आला.

मनोहर फेरवानी म्हणाले, ‘क्रिप्स फाउंडेशनने सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. या दृष्टिहीन मुलामुलींना वैवाहिक जीवनाचा आनंद मिळावा, त्यांना आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. राज्यातील २५ दृष्टीहीन मुला मुलींचे थाटामाटात लग्न लावून देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. संसार थाटण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी त्यांना संस्थेमार्फत दिल्या आहेत. अनाथ मुलींचे कन्यादान संस्थेच्या स्वयंसेवकांनी केले आहे.

‘माझ्यात इतरांपेक्षा काहीतरी कमी आहे. या गोष्टीची जाणीव कुटुंबाकडून नाही; पण इतरांकडून होत आली आहे. परंतु आज माझे लग्न एवढ्या थाटामाटात होईल, अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. परंतु आजचा दिवस हे माझ्यासाठी जणू एक स्वप्नच आहे. या सगळ्यात फाउंडेशनने आम्हाला खूप मदत केली. आता मी एक विशेष मुलगा यात मला काही कमी वाटत नाही,’ असे मत संस्कार धोत्रे या नवऱ्या मुलाने व्यक्त केले.

‘इतर मुलींप्रमाणे मलादेखील स्वप्नातला राजकुमार हवा असे. या सोहळ्यामुळे मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे. आता आम्ही दोघे मिळून नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहोत. एकमेकांचा आधार बनणार आहोत. आयुष्यातला एक आनंदाचा क्षण फाउंडेशनमुळे आम्हाला अनुभवता आला. क्रिप्स फाउंडेशनचे मनापासून आभार,’ अशी भावना प्रज्ञा शिंदे या नववधुने व्यक्त केली.

अमरावती, नांदेड, सोलापूर, औरंगाबाद, कल्याण आणि पुणे येथील २५ जोडपी विवाहबंधनात अडकली. यातील ४ जोडपी पुण्यातील होती. आजच्या विवाहसोहळ्यात संजय रंबेकर-आशा पछाडे, रमेश साहू-रेश्मा नाईक, राजू विंगणवाड-क्रांती रायबोले, पराग लवांडे-नागमणी लाला, परमेश्वर सोळंकी-अर्चना ढोरमारे, अनिल राव-छबी वानखेडे, संजू खेरडे-तारा हाटे, दिलीप कांबळे-दीक्षा कबाडे, योगेश तायडे-दीक्षा सदाशिवे, रमेश पवार-वैशाली तायडे, सुनील वधुळे-विद्या सरकटे, दीपक लिंगायत-आशा स्वामी, विक्रांत गायगोले-नीता धुर्वे, महेश शिंदे-ललिता इंगळे, संस्कार धोत्रे-प्रज्ञा शिंदे, प्रवीण भोसले-मनीषा नागपुरे, सचिन खेडेकर-अनिता कदम, संदीप निकुंब-पल्लवी उपासे, कांतीलाल पवार-रुपाली गरड, अजय घोरपडे-सुप्रिया जाधव आणि संदीप काठ-मनीषा बागुल हे विवाहबंधनात अडकले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZWPBI
Similar Posts
कोहिनूर समूहाची मातोश्री इस्टेटशी भागीदारी पुणे : बांधकाम व्यवसायातील एक अग्रगण्य नाव म्हणून सुपरिचित असलेल्या कोहिनूर समूहाने तुळशीबाग येथे साकारत असलेल्या ‘नवी तुळशीबाग-मारणे प्लाझा’ या शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पासाठी मातोश्री इस्टेट या कंपनीशी भागीदारी केली आहे. याविषयीची अधिकृत घोषणा कोहिनूर समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत केली
उज्वला योजनेमुळे महिलांना सन्मान पुणे : ‘प्रधानमंत्री उज्वला योजना ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबाला गॅस जोडणीबरोबरच त्या कुटुंबातील महिलेला सन्मान मिळवून देणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय जिव्हाळ्याची योजना आहे', असे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे यांनी केले.
सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन पुणे : ‘सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या एक हजार ६७ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, १८ मार्च व सोमवारी १९ मार्च असे दोन दिवस हा महोत्सव साजरा केला जाणार आहे,’ अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली
लक्ष्मीकांत देशमुख यांची कॉसमॉस बँकेला सदिच्छा भेट पुणे : ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी देशमुख यांचे स्वागत करून, त्यांचा परिचय करून दिला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language